Posts

Showing posts from August, 2019

Yoga Day

Image
Pohregaonkar

" हुतात्मा शिरीषकुमार--एक धगधगते अग्निकुंड."

Image
                           " हुतात्मा शिरीषकुमार--एक धगधगते अग्निकुंड."  शिरीषकुमारचा जन्म २८ डिसेंबर १९२६ रोजीचा. १९४२ साली महात्मा गांधींच्या चलेजाव चळवळीने भारतभर जनआंदोलन उसळले. गावागावांतून "चले जाव"च्या घोषणा घुमू लागल्या.तिरंगी झेंडे घेऊन मिरवणुका निघू लागल्या. त्यात सर्वांचा, लहान मुलांचाही सहभाग होता. नंदुरबार या आजच्या जिल्हा ठिकाणच्या गावातील ही गोष्ट. शिरीषकुमार व त्याच्या मित्रांनीही अशीच मिरवणूक काढली होती.तिरंगी झेंडा घेतलेला शिरीषकुमार व मुले "वंदे मातरम" च्या घोषणा देत चालली होती.मंगल बाजार परिसरात मिरवणूक आल्यावर अगोदरच तैनातीत असलेल्या पोलिसांनी मिरवणूक अडवली. मिरवणूक सोडून आपापल्या घरी जाण्यास फर्मावले.बंदुकीचा धाक दाखवला. तरीही मुले जागची हलली नाहीत.उलट हातातील तिरंगी झेंडा उंचावून " वंदे मातरम "अशी घोषणा शिरीषकुमारने दिली व " हिंमत असेल तर माझ्यावर गोळ्या झाडा",असे ठणकावुन म्हणाला.  क्षणार्धात रोखलेल्या बंदुकीतून गोळी सुटली. शिरीषकुमार धारातीर्थी पडला. तो पडत असतानाच त्याच्या हाती ...

" शिक्षक दिन - ५ सप्टेंबर "

Image
                                                    " शिक्षक दिन -  ५ सप्टेंबर " भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. डॉ. राधाकृष्ण यांचे शिक्षकांप्रती असलेले प्रेम व आदर पाहून भारत सरकारने त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा करण्‍याचा संकल्प केला. ती परंपरा अजूनही सुरू आहे व भविष्‍यातही सुरूच राहिल. 1962 मध्ये डॉ. राधाकृष्णन् यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकांचा गौरव दिन म्हणून साजरा करण्याची इच्छा प्रकट केली होती. देशातील शिक्षकांचा गौरव हाच आपला गौरव असल्याचे त्यांनी सांगितले होते.   डॉ. राधाकृष्णन्‌ यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी मद्रा...

देवगिरी--पैठण शैक्षणिक सहल...

Image
School Trip To Devgiri Fort, Aurangabad जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांव्यतिरिक्त अभिमान बाळगावा अशा अनेक वास्तू आहेत. यादवांची राजधानी असलेला देवगिरीचा दुर्ग म्हणजेच दौलताबादचा किल्ला हा त्यापैकीच एक आहे. रामदेवराव यादवांपासून निझामशाहीपर्यंत अनेक राजांचे कर्तृत्व पाहिलेला हा किल्ला औरंगाबादची शान आहे. औरंगाबादपासून सुमारे 15 किलोमीटरवर असलेल्या या किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी असे आहे. देवगिरी या नावामागेही एक दंतकथा आहे. एकदा शंकर-पार्वती सारिपाट खेळत होते. त्यात शंकर पराभूत झाले आणि रागारागाने वेरूळच्या अरण्यात निघून गेले. पार्वती भिल्लिणीच्या वेशात म्हैसमाळच्या डोंगरात राहू लागली. या भिल्लिणीवर शंकर अनुरक्त झाले आणि त्यांनी देवांना वेरूळ परिसरात येण्यास मनाई केली आणि जवळच असलेल्या ज्या डोंगरावर देव राहू लागले तो देवगिरीचा डोंगर होय. या डोंगरावर बांधलेला किल्ला म्हणून यास देवगिरीचा किल्ला म्हणतात. राष्ट्रकुट राज्यातील र्शीवल्लभ याने इ.स. 756 ते 772 या काळात हा किल्ला उभारला. भारतातील इतर कोणत्याही राज्यात दिसणार नाही असा हा किल्ला दक्षिणेच्या प्रवेशद्वारीच उभा असल्यामुळे दक्षिण...