" हुतात्मा शिरीषकुमार--एक धगधगते अग्निकुंड."


                          " हुतात्मा शिरीषकुमार--एक धगधगते अग्निकुंड."

 शिरीषकुमारचा जन्म २८ डिसेंबर १९२६ रोजीचा. १९४२ साली महात्मा गांधींच्या चलेजाव चळवळीने भारतभर जनआंदोलन उसळले. गावागावांतून "चले जाव"च्या घोषणा घुमू लागल्या.तिरंगी झेंडे घेऊन मिरवणुका निघू लागल्या. त्यात सर्वांचा, लहान मुलांचाही सहभाग होता. नंदुरबार या आजच्या जिल्हा ठिकाणच्या गावातील ही गोष्ट. शिरीषकुमार व त्याच्या मित्रांनीही अशीच मिरवणूक काढली होती.तिरंगी झेंडा घेतलेला शिरीषकुमार व मुले "वंदे मातरम" च्या घोषणा देत चालली होती.मंगल बाजार परिसरात मिरवणूक आल्यावर अगोदरच तैनातीत असलेल्या पोलिसांनी मिरवणूक अडवली. मिरवणूक सोडून आपापल्या घरी जाण्यास फर्मावले.बंदुकीचा धाक दाखवला. तरीही मुले जागची हलली नाहीत.उलट हातातील तिरंगी झेंडा उंचावून " वंदे मातरम "अशी घोषणा शिरीषकुमारने दिली व " हिंमत असेल तर माझ्यावर गोळ्या झाडा",असे ठणकावुन म्हणाला.  क्षणार्धात रोखलेल्या बंदुकीतून गोळी सुटली. शिरीषकुमार धारातीर्थी पडला. तो पडत असतानाच त्याच्या हाती असलेला झेंडा लालदासने उंचावला व नारा दिला."वंदे मातरम्" त्याच्यावरही पोलिसांनी गोळी झाडली. तोच तिरंगी झेंडा धनसुख या मुलाने हाती घेतला.याप्रमाणे घनश्याम व शक्तीधर या त्यांच्या मित्रांनीही एकेकाच्या हातातील तिरंगी झेंडा घेत छातीवर गोळ्या झेलल्या. शिरीषकुमार आणि त्याच्या मित्रांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलल्या बलिदानामुळे ते अमर झाले..त्यांच्या हौतात्म्याच्या ज्वाला संपुर्ण देशभर वणव्यासारख्या पसरल्या.अन् यातुनच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले...९ सप्टेंबर हा  शिरीषकुमारचा स्मृती दिन.......विनम्र अभिवादन ....कोटी कोटी नमन.....जय हिंद......जय महाराष्ट्र .....,..,,

कुलकर्णी मुकुंद उध्दवराव,

 प्रा.शिक्षक, जि.प.प्रा.शा.फावडेवाडी, ता. रेणापुर,जि.लातुर..

9403013309

mukundk656@gmail.com

Comments

Popular posts from this blog

" शिक्षक दिन - ५ सप्टेंबर "

हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा-- बहिर्जी नाईक.